होमपेज › Pune › येरवड्यात शिवसेना व एमआयएममध्ये जुंपली

येरवड्यात शिवसेना व एमआयएममध्ये जुंपली

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:14AMयेरवडा : वार्ताहर 

एमआयएमच पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीने महापालिकेच्या आरोग्य कोठीचे कुलूप परस्पर साहित्य बाहेर काढल्याप्रकरणी शिवसेनेच्या तीनही नगरसेवकांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयात आंदोलन केले. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत हलणार नसल्याचा पवित्रा घेतल्यानंतर अखेर उपायुक्तांकडून चौकीशचे लेखी आश्‍वासन मिळाले. दरम्यान, नगरसेविकेच्या पतीने मात्र  ही केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप केला आहे. असे असले तरी  विकास कामांच्या कुरघोडीतून शिवसेना व एमआयएम मधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. 

येरवडा लक्ष्मीनगर येथे श्रीमाळ आरोग्य कोठी आहे. या परिसरात बहुमजली पार्किंग करावयाचे असल्याने याठिकाणी असलेली आरोग्य कोठीतील साहित्य शिवसेनेच्या नगरसेवकांच्या सांगण्यावरून दवाखान्यासाठी बांधलेल्या नवीन इमारतीत ठेवण्यात आले होते. ही बाब एमआयएमच्या नगरसेविकेच्या पतीनां समजली. त्यांनी  कोठीतील ठेवण्यात आलेले साहित्य बाहेर काढले. यानंतर शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी आंदोलनाचा पत्रिा घेत आपल्या दोन्ही सहकारी नगरसेवकांसमवेत एमआयएमच्या नगरसेविकेच्या पतीवर फौजदारी कारवाई व्हावी यासाठी  येरवडा क्षेत्रीय कार्यालयात आंदोलन केले.  

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त रजेवर असल्याने उपायुक्त विजय दहिभाते यानी कार्यालयात येवून शिवसेनेच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली. गटनेते संजय भोसले यानी आरोग्य कोणतीही परवानगी न घेतला कोठीतील  साहित्य बाहेर काढणार्‍या नगरसेविकेच्या पती व कार्यकर्त्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली. उपायुक्त दहिभाते यानी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकार्‍यांना जागेवर जावून वस्तूस्थितीची पहाणी करण्याच्या सुचना केल्या. 

त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळांला असा प्रकार करणार्‍यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा सुचनांचे पत्र सहाय्यक महापालिका आयुक्तांना दिल्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आंदोलन मागे घेतले. यावेळी नगरसेवक अ‍ॅड.अविनाश सावळे, नगरसेविका श्‍वेता चव्हाण,  उपशहरप्रमुख आनंद गोयल, श्री चव्हाण यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.