Sun, Feb 17, 2019 15:08होमपेज › Pune › डंपरखाली सापडून विद्यार्थिनीचा मृत्यू

डंपरखाली सापडून विद्यार्थिनीचा मृत्यू

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी 

आईबरोबर दुचाकीवरून शाळेतून घरी जाताना ओव्हरटेक करणार्‍या डंपरचा धक्का लागल्याने पडून डंपरच्या चाकाखाली सापडल्याने सहा वषार्र्ंच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. मुलीची आई किरकोळ जखमी झाली.  ही दुर्दैवी घटना काळेपडळ येथे बुधवारी दुपारी घडली. संतप्त जमावाने डंपर चालकाला बेदम चोपले. तसेच चालकांविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

मानसी स्वप्नील जाधव (6 वर्षे, कापडे वस्ती, फुरसुंगी) असे या मुलीचे नाव आहे. तर रूपाली स्वप्नील जाधव असे तिच्या आईचे नाव आहे. तुकाराम शांतप्पा बारणे (42, वडाची वाडी ) असे डंपर चालकाचेनाव आहे.   मानसी काळेपडळ येथील शाळेत पहिल्या इयत्तेत शिकते. नेहमीप्रमाणे रूपाली मुलीला आणण्यासाठी शाळेत गेल्या. तेेथून दुचाकीवर मायलेकी फुरसुंगीला येत असताना त्यांच्या पाठीमागून तुकाराम बारणे हा डंपर (एम. एच. 12, एच. डी. 3733) घेऊन येत होता.  त्याच्या डंपरचा धक्का मोपेडला लागला. त्यामुळे दोघी खाली पडल्या. मानसी डंपरच्या मागच्या चाकाखाली आली आणि तिच्या डोक्यावरून चाक गेले. 

तिचा जागीच मृत्यू झाला. काही वेळातच तेथे पोलिस दाखल झाले. तुकाराम बारणे याला जबर मारहाण झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वानवडी पोलिस करत आहेत.