Tue, Jul 16, 2019 23:55होमपेज › Pune › गुरू दादा वासवानी यांच्या निधनाने पिंपरी कॅम्पात शोककळा

गुरू दादा वासवानी यांच्या निधनाने पिंपरी कॅम्पात शोककळा

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 11:09PMपिंपरी : प्रतिनिधी

अध्यात्मिक गुरु दादा जे. पी.  वासवानी यांचे गुरुवारी (दि.12) निधन झाले. त्यांच्या जाण्याने पिंपरी चिंचवडमधील सिंधी समाज शोकसागरात बुडाला होता. गुरु दादा वासवानी यांना आदरांजली म्हणून सिंधी बांधवांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी (दि.13) गुरु दादा वासवानी यांना आदरांजली म्हणून पिंपरी कॅम्प परीसरातील दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. 

साधू वासवानी मिशनमध्ये त्यांचे पार्थिव अंतिम दर्शऩासाठी ठेवण्यात आले होते.  पिंपरी कॅम्पातील सिंधी बांधवांनी पुण्यातील साधु वासवानी मिशन येथे आपल्या अध्यात्मिक गुरुचे अंतिम दर्शन घेतले. गुरु जे. पी. वासवानी यांनी सर्वांना प्रेम व अहिंसेच्या मार्गानं चालण्याची शिकवण दिली. त्यांच्या जाण्याने सिंधी समाज पोरका झाला असून कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना यावेळी सिंधी समाज बांधवांनी व्यक्त केल्या.