Fri, Jul 19, 2019 18:40होमपेज › Pune › तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Published On: May 11 2018 12:10PM | Last Updated: May 11 2018 12:21PMपिंपरी : प्रतिनिधी 

हिंजवडी माण येथील बापूजी बुवा मंदिराच्या वरील बाजूच्या डोंगरावर गळा चिरलेल्या अवस्थेत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असून अधिक तपास सुरु आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी माण येथील डोंगरात अंदाजे ३५ वर्षे वयाच्या तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. हा खुनाचा प्रकार की आत्महत्येचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडलेला असून शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास उघडकीस आला. हे ठिकाणी पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते.  घटनास्थळी पौड आणि हिंजवडी पोलिस दाखल झाले आहेत.

घटनास्थळी पोलिसांना दुचाकी आणि एक कार आढळून आलेली आहे. तसेच गळा कपलेला कटर, झुरळ मारण्याचे औषध, किटकनाशक इत्यादी मिळाले आहे. मृताची कपडे एका ठिकाणी तर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी होता. घटनास्थळावरील वाहनांच्या नंबरवरुन मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास पौड आणि हिंजवडी पोलिस करत आहेत.

Tags : Dead, Youth, Crime, Murder, Hinjawadi