Tue, Jul 23, 2019 06:17होमपेज › Pune › दौंड तिहेरी खून प्रकरण : सहाय्यक फौजदार शिंदेला १२ दिवस पोलिस कोठडी

दौंड तिहेरी खून प्रकरण : सहाय्यक फौजदार शिंदेला १२ दिवस पोलिस कोठडी

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 1:33AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

दौंड येथे पैशाच्या कारणावरून भरदिवसा गोळ्या घालून तिघांचा खून करणार्‍या राज्य राखीव पोलिस दलातील सहायक फौजदाराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. कटारे यांनी दि. 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्याचा आदेश दिला. 

संजय बळीराम शिंदे (37,रा. गोपाळवाडी रोड, दौंड) असे त्याचे नाव आहे. गोपाळ काळुराम शिंदे (34, रा. भवानीनगर, दौंड), परशुराम गुरूनाथ पवार (28, रा. वडारगल्ली, दौंड) आणि अनिल विलास जाधव (34, रा. जिजामातानगर, लिंगाळी, दौंड) यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याने मंगळवारी खून केला.  

संजय शिंदेला सुरक्षेच्या कारणास्तव दौंड येथील न्यायालयात हजर न करता बुधवारी बुरखा घातलेल्या अवस्थेत शिवाजीनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकार्‍यासमोर हजर करण्यात आले. 

सरकारी पक्षाच्या वतीने एस. सी. लिंगायत यांनी युक्तिवाद केला. तर बचाव पक्षाचे वकील हेमंत झंजाड यांनी आरोपीची बाजू मांडून न्यायालयीन कोठडीची मागणी केली.