Wed, Jul 17, 2019 12:07होमपेज › Pune › ‘त्यांनी दिल्ली, मुंबई सांभाळावी!’

‘त्यांनी दिल्ली, मुंबई सांभाळावी!’

Published On: Aug 30 2018 1:23AM | Last Updated: Aug 29 2018 11:59PMपिंपरी : प्रतिनिधी

खासदारांनी दिल्लीतील संसदेचे आणि आमदारांनी मुंबईतील मंत्रालयातील कामकाज सांभाळावे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाज करण्यासाठी 133 नगरसेवक समर्थ आहेत, अशी टीका करीत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वादात उडी घेतली.

पालिकेच्या कारभारावरून खा. बारणे व आ. जगताप यांच्या आठवड्याभरापासून शाब्दीक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यासंदर्भात ते बोलत होते. साने म्हणाले की, खासदारांनी दिल्लीत आणि आमदारांनी मुंबईत देणे अपेक्षित आहे. तेथील कामकाज करीत शहरासाठी निधी आणल्यास त्याचे स्वागत आहे. मात्र, भाजपचे दोन्ही आमदार विधानसभेत शहरातील समस्याबाबत मूळ गिळून गप्प बसतात. त्यांनी शहरातील प्रश्‍न तेथे मांडावेत. 

मात्र, पालिका कामकाजात उठसूठ वारंवार बैठका घेऊन लुडबूड करण्याची काही गरज नाही. बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत घेण्याची परंपराच सुरू झाली आहे. पालिकेचे निवडून आलेले 128 आणि स्वीकृत 5 असे एकूण 133 नगरसेवक आहेत. ते येथील कामकाज पाहण्यास विश्‍वस्त म्हणून समर्थ आहेत. 

मात्र, येथील कोट्यवधींच्या विशेषत: स्थायी समितीमध्ये भाजपच्या दोन्ही आमदारांना रस अधिक आहे. त्यामुळे ते पालिकेतच अनेकदा घुटमळतात. त्यांना प्रत्यक्ष शहराच्या विकासात काही घेणे-देणे नाही. कोट्यवधींच्या कामांमध्ये ‘रिंग’ करण्याचा विचारात त्याचा अर्ध्या दिवस खर्ची पडतो, अशी टीका साने यांनी केली. खासदार व आमदारांनी आपल्या पदाचा राजीमाना देऊन पालिकेत नगरसेवक म्हणून यावे. महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष अशी पदे घेऊन काम करून दाखवावे, अशी उपरोधिक सल्ला त्यांनी दिला.