Fri, Jul 19, 2019 17:51होमपेज › Pune › दापोडी-निगडी ‘बीआरटी’ ‘ट्रायल रन’ पूर्ण

दापोडी-निगडी ‘बीआरटी’ ‘ट्रायल रन’ पूर्ण

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 1:35AMपिंपरी : प्रतिनिधी

उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे तक्रारदार अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये दापोडी ते निगडी या 12.50 किलोमीटर अंतराच्या दुहेरी बीआरटीएस मार्गाची ‘ट्रायल रन’ बुधवारी (दि.25) पुर्ण करण्यात आली. या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमपीएलचे अधिकारीही उपस्थित होते. या संदर्भात ‘दापोडी- निगडी ‘बीआरटी’ मार्गावर तक्रारदारासोबत ‘ट्रायल रन’ घ्या, उच्च न्यायालयाचा पालिकेस आदेश’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने सोमवारी (दि.23) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार पालिकेने कार्यवाही केली आहे.

आयआयटी पवईच्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार आवश्यक सर्व वाहतुक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत, असा पालिकेचा दावा आहे.  या मार्गावर सुरक्षा उपाययोजनांची कमतरचा असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचा तक्रारीचा दावा अ‍ॅड. हिम्मत जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून पालिकेने तक्रारदार जाधव यांच्यासह दापोडी- निगडी बीआरटी मार्गावर ‘ट्रायल रन’ मंगळवारी व बुधवारी असे दोन दिवस घेतली. 

गत्यामध्ये दोन्ही बाजूने संपूर्ण मार्गांची पाहणी करण्यात आली. वर्दळीच्या व चौकातील ठिकाणी वाहतुक सुरक्षा उपाययोजना तसेच, बसथांब्याची पाहणी करण्यात आली. या वेळी पालिकेस सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंदारे, उपअभियंता दीपक पाटील, संदेश खडतरे, अनिल राऊत, प्रवक्ते विजय भोजने, पीएमपीएलचे सरव्यवस्थापक, निगडी व पिंपरी डेपोचे व्यवस्थापक, आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात पालिका प्रशासन व अ‍ॅड. जाधव हे स्वतंत्रपणे अहवाल न्यायालयात सादर करणार आहेत. त्या अहवालावरून न्यायालय सदर बीआरटी मार्ग सुरू करण्याबाबत आपला निर्णय देणार आहे. त्यावर बीआरटीचे भवितव्य ठरणार आहे. 

Tags : Pune, Dapodi, Nigdi, BRT, trial, run, completed