Mon, Jun 17, 2019 18:15होमपेज › Pune › धोकादायक ११० पुलांवरून होतोय प्रवास

धोकादायक ११० पुलांवरून होतोय प्रवास

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 12:45AMपुणे : समीर सय्यद

बांधकाम विभागाकडून 183 पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले असून, यापैकी तब्बल 112 पुलांची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील दोन पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, 110 पुलांवरून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरूच आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर एकूण 2472 पूल आहेत. 

139 पुलांना सेन्सर आवश्यक

पुराच्या पाण्यात बुडणार्‍या पुलांसाठी व पूर पातळी धोक्याच्या पातळीवर गेल्याची सूचना देणारे इलेक्ट्रॉनिक सेन्सर 139 पुलांना बसविण्याची गरज असल्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिटमधून समोर आले आहे. त्यातील 121 पुलांना सेन्सर बसविण्यात आले आहेत. इतर आवश्यक पुलांवर सेन्सर बसविण्यासाठी 77 लाख रुपयांची गरज आहे.