Wed, Jul 17, 2019 10:21होमपेज › Pune › ‘सुंदर मी होणार’ ब्यूटी सेमिनारचे आयोजन

‘सुंदर मी होणार’ ब्यूटी सेमिनारचे आयोजन

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 12:46AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

सुंदर दिसावे ही प्रत्येक स्त्रीच्या मनात सुप्त इच्छा असते. तिच्या या इच्छेचा सन्मान करण्यासाठी संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून ‘सुंदर मी होणार’ या ब्यूटी सेमिनारचे विभागवार आयोजन करण्यात आले होते. दैनिक ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. 

सौंदर्य ही केवळ इच्छा नसून शास्त्र आहे. ब्यूटिपार्लरमधे पुरेशी शास्त्रोक्त माहिती घेऊन गेल्यास आपल्या गरजेनुसार रास्त दरात योग्य ट्रीटमेंट मिळत नाही. यासाठी लीज ब्यूटी सेंटर आणि स्पाच्या संचालिका लीना खांडेकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

त्वचेची व केसांची काळजी कशी घ्यायची, समारंभानुसार मेकअप, वेशभूषा, हेअरस्टाईल कशी करायची, त्वचेच्या रंगानुसार, केसांच्या टेक्चरनुसार कॉस्मेटिक्स कशी निवडायची याबद्दल त्यांनी सप्रयोग संवाद साधला. अंडर आय सर्कल, पिंगमेंटेशन, पांढरे केस, स्किनवर अचानक येणारे काळे डाग, अ‍ॅलर्जी, टेस्टस हेअर ट्रान्सप्लांट, लेसर ट्रीटमेंट अशा अनेक विषयांबद्दल ‘मेडिकल नॉलेज आणि सौंदर्योपचार याबद्दल वास्तव माहिती देखील त्यांनी या वेळी दिली. बॉडी पॉलिशिंग, पर्मनंट स्ट्रेटनिंग, कलरिंग अशा अनेक ट्रीटमेंटबद्दल माहिलांच्या मनात साशंकता होती. त्याचा सविस्तर तपशील त्यांनी दिला. पार्टी, अ‍ॅाफिस, विवाह सोहळा याबरोबरच डेली मेकअप याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हेअर स्टाईलमध्ये लो बन, फ्रेंच बन, बॅक कोम्बिंग, चेहर्‍यानुसार पफ काढणे शिकवण्यात आले. साडी ट्रेपिंगमध्ये नऊवार, सहावार, बंगाली, साडीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. 

विभागवार झालेल्या या सहा कार्यक्रमांत मिळून लकी ड्रॉ काढण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अंजली जोशी, श्रावणी कवाने, सुवर्णा करंजे (तेजस्विनी महिला मंच), नीता पठाडे आणि कुंदा शिंदे (समूह संघटिका), मनीषा शिंदे (समुपदेशिका), रसिका बिबवे आणि नीलिमा वानखेडे, दीपमाला परदेशी, आश्‍विनी शेटे, निशा गायकवाड, रेश्मा थोपटे, पल्लवी शेळके, दीपा मारटकर, पल्लवी भोसले, वैष्णवी कवडे, अंजुताई वाघ, वैशाली नाईक, मेघना झुझम, मैथिली हजारे तसेच लीज ब्यूटी सेंटर आणि स्पाच्या सरिता शिंदे, प्रज्ञा थरकुडे, पूनम भालेराव, युगंधर मैत्रसकर, योगिता गोगावले, प्राजक्ता आढवडे, शीतल निकम, उज्ज्वला दांगट यांनी सहभाग घेतला होता. 

सण, समारंभात उठून दिसावे या इच्छेने गृहिणींनी कार्यशाळेला मोठा प्रतिसाद दिला, तर जॅाबच्या ठिकाणी दिवसभर निटनेटके दिसावे यासाठी वर्किंग वूमन्स सेमिनारमध्ये सहभागी झाल्या होत्या. उपक्रमाची संकल्पना व संयोजन मधुरा दाते यांनी केले होते.