Wed, Jul 17, 2019 20:58होमपेज › Pune › ‘क्राऊड फंडींगच्या माध्यमातून पाठबळ द्या’

‘क्राऊड फंडींगच्या माध्यमातून पाठबळ द्या’

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:43AMपुणे : प्रतिनिधी 

मला माझ्या सुरुवातीच्या काळात काही सामान्यांनीच मदत केल्याने मी उभा राहू शकलो. त्यातूनच उभा राहिलेला डिएसके समूह सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. सामान्य नागरिकांनी मदत केल्यास आम्ही पुन्हा भरारी घेऊ. त्यामुळे उद्योग पूर्ण करण्यासाठी तसेच भांडवल उभारणीसाठी सामान्य नागरिकांनी स्वत:हून सामाजिक कार्यासाठी मदत करण्याच्या भावनेतून अमेरिकेसारख्या देशांत वापरल्या जाणार्‍या ‘क्राऊड फंडींग’च्या माध्यमातून मला पाठबळ द्या, असे भावनिक आवाहन डी. एस. कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी ग्लोबल सेतूचे मंदार जोगळेकर उपस्थित होते. 

यावेळी डिएसके म्हणाले, डिएसके उद्योगसमूह उभारण्यात सामान्य माणसांचा मोठा हात आहे. सन 2016 पासून आमच्या आर्थिक समस्यांना सुरूवात झाली. 2017 मध्ये त्याचे धक्के बसू लागले.  बीज भांडवलच संपल्याने आम्ही ठेवीदार व गुंतवणूकदारांना पैसे देण्यास अडचण येऊ लागली आहे. आठ हजार गुंतवणूकदार, अडीचहजार फ्लॅटधारक, फुटबॉस अ‍ॅकॅडमीतील 350 विद्यार्थी, यासह इतर उद्योगातील लोक या समूहावर अवलंबून आहेत. माझ्याकडील बीजभांडवल संपले तरी स्थावर मालमत्ता आहेत. जमीन विक्रीतून पैसा उभा करणे हा अखेरचा पर्याय आहे. मात्र मला मदत करणारेही समोर येत आहेत. माझ्यावर विश्‍वास असलेल्या लोकांनी मला मदतीचा हात पुढे केला आहे. विदेशात एखादा उद्योजक अडचणीत असेल तर त्याला क्राऊड फंडींगच्या माध्यमातून उभे राहण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे या माध्यमातून डिएसके भीक मागत नाही; मात्र नागरिकांकडून मदतीची अपेक्षा करतो. 

डिएसके कधी कुणाला फसविणार नाही अशी खात्री असणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच मी या वर्गासाठी क्राऊड फंडींगच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म उभा करून देत आहे, असे मंदार जोगळेकर म्हणाले.