Sat, Dec 14, 2019 05:02होमपेज › Pune › डीएसकेंचा भाऊ मकरंद कुलकर्णींना मुंबईत अटक

डीएसकेंचा भाऊ मकरंद कुलकर्णींना मुंबईत अटक

Published On: Aug 13 2019 3:05PM | Last Updated: Aug 14 2019 12:10AM

संग्रहित छायाचित्रपुणे : प्रतिनिधी

कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणार्‍या दिपक सखाराम कुलकर्णी यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना अमेरिकेला पळून जात असताना पोलिसांनी मुंबईत अटक केली.

पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिपक सखाराम कुलकर्णी व पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावर एमपीआयडीनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात डीएसके दांम्पत्यासह त्यांचे नातेवाईक आणि कंपनीमधील इतरांचा समावेश आढळून आला होता. त्यानुसार, पोलिसांनी यापुर्वी मुलगा शिरीष, मुलगी यांच्यासह एकूण 11 जणांना अटक केली आहे. 

दरम्यान डीएसके दांम्पत्य सध्या येरवडा कारागृहात आहे. या गुन्ह्यात त्यांचा भाऊ मकरंद कुलकर्णी यांचा पैसे वळविल्याप्रकरणात समावेश आढळून आला होता. मात्र, ते पोलिसांना सापडले नव्हते. त्यांचा शोध घेण्यात येत होता.

मंगळवारी (१३) रोजी सकाळी मुंबई विमानतळावर मुंबई पोलिसांनी मकरंद यांना ताब्यात घेतले. त्यावेळी ते अमेरिकेत पळून जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मुंबई पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक मुंबईला रवाना झाले आहे. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यांना घेऊन हे पथक सायंकाळी पुण्यात दाखल होईल. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.