Tue, Apr 23, 2019 10:16होमपेज › Pune › डीएसकेंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 

डीएसकेंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 

Published On: Mar 01 2018 8:20PM | Last Updated: Mar 01 2018 8:20PMपुणे : प्रतिनिधी 

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी चौकशीसाठी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना कोर्टाने एक मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. याची मुदत गुरुवारी संपली.

त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांच्या मालकीच्या सहा इम्पोर्टेड कार आणि एक दुचाकी जप्त केली होती.