Sat, Apr 20, 2019 18:32होमपेज › Pune › डीएस कुलकर्णी यांच्यावर १०० कोटींचा दावा

डीएस कुलकर्णी यांच्यावर १०० कोटींचा दावा

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 26 2017 12:42AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या भावाचे जावई केदार वांजपे डीएसकेंवर 100 कोटींचा दावा ठोकणार आहेत. वाजपे यांनी तशी नोटीस बजावल्याने डीएसकेंच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

डीएसके यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केदार वांजपे हे डीएसकेंच्या व्यवसायाची माहिती आरटीआय कार्यकत्यार्र्ंना पुरवत असल्याचा आरोप केला होता. वांजपे हे आपल्याविषयी गुंतवणूकदारांमध्ये चुकीची माहिती पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डीएसके समूहातून मी बाहेर पडलो ते त्यांच्याशी झालेल्या वादामुळे. कारण, त्यांच्या काही गोष्टी मला पटत नव्हत्या. त्यामुळे ती कंपनी सोडली. त्यानंतर त्यांचा आणि माझा काहीच संबंध नाही. डीएसकेंनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी जाहीररीत्या माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकण्यात येईल, अशी नोटीस त्यांनी डीएसकेंना बजावली आहे. अ‍ॅड. प्रसाद कुलकर्णी यांनी वांजपे यांच्या वतीने ही नोटीस बजावली आहे.