होमपेज › Pune › प्रदूषणमुक्तीसाठी सायकल शेअरिंग करा’ 

प्रदूषणमुक्तीसाठी सायकल शेअरिंग करा’ 

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:47PM

बुकमार्क करा

औंध : वार्ताहर 

स्मार्ट सिटी अंतर्गत औंध येथील रस्त्यांवर सायकल ट्रॅक करण्यात आले आहेत. पांढरा व लाल पट्टा आखण्यात आला आहे. त्यामुळे या स्मार्ट परिसरातील नागरिकांनी सायकलचा शेरिंगचा जास्तीत जास्त वापर करून प्रदुषण व वाहतुककोंडी पासून सुटका मिळेल असे मत स्मार्ट सिटीचे सिईओ राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केले. 

औंध स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल शेरिंगच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष विजय शेवाळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, माजी महापौर विजय शेवाळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवि ओसवाल, राजेंद्र मुरकुटे, अनंद जुनवणे, डॉ.चौधरी आदी उपस्थित होते. 

औंधमध्ये एकूण दहा ठिकाणी ही सायकल उपलब्ध होणार असून नागरिकांनी परिसरात फिरण्यासाठी, खरेदीसाठी सायकलींचा वापर करण्याचे अवहान यावेळी करण्यात आले. एकूण 200 सायकल औंध साठी देण्यात येणार असून त्यातील आज 110 सायकला नागरिकांना वापरासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात अल्या आहेत.

सायकल ट्रॅक असुरक्षित

सायकल शेअरिंग हा स्मार्ट सिटीचा विषय पुढे येत असताना सायकल ट्रॅक मात्र असुरक्षित करण्यात आलेले आहेत. औंधमध्ये मुख्य रस्त्यालाच रंग देऊन सायकल ट्रॅक केल्याने हा मुख्य रस्त्याच्या प्रवाहातच आहे, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. तसेच रंग देऊन  करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवर 75 टक्के वहाने पार्किंग झालेली पहायला मिळत आहेत. त्यामुळे हे सायकल ट्रॅक होणार की पार्किंग हा प्रश्‍न ही नागरिकांनी पडला आहे.