Mon, Jun 17, 2019 03:03होमपेज › Pune › आयसीएआरच्या प्रवेश परीक्षेत सावळागोंधळ 

आयसीएआरच्या प्रवेश परीक्षेत सावळागोंधळ 

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 1:19AMपुणे : लक्ष्मण खोत

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्यावतीने एमएससी कृषी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या  (आयसीएआर) घेण्यात आलेल्या 23 व्या प्रवेश परीक्षेत परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर सावळागोंधळ दिसून आला. देशभरातील कृषी पदविधरांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शुक्रवारी ( दि. 22 जून ) ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्यात आली. 

कृषी पदविधरांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत यश मिळविणार्‍या गुणवंताना आयसीएआर द्वारे देशातील विविध इन्स्टिट्यूट मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. दरम्यान, यावर्षी घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेत सुरवातीपासूनच आयसीएआर द्वारे अंदाधूदी कारभार सुरु असल्याचा आरोप उमेदवारांनी केली आहे. आयसीएआरद्वारे सुरवातीला परीक्षा 13 मेला परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, त्यानंतर परीक्षेची तारीख बदलत ती 22 जूनला घेण्यात आली. त्यानंतर प्रवेश पत्र 13 जून ला मिळणार होते, ते 16 जून पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध झाले नव्हते. मॉक टेस्टची वेळ ही बदलण्यात आली होती. यावर्षी या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडला असल्याचे उमेदवारांनी सांगितले. 

आयसीएआर चा ही परीक्षा देशातील विविध केंद्रांवर एकाचवेळी घेतली जाते. पुणे शहरात दोन ठिकाणी परीक्षेसाठी केंद्र निवडण्यात आली होती. मात्र, पुण्यातील कोंढवा येथील प्रो-स्कील कन्सल्टल्टन्टीं प्रा. लिमिटेड येथील परीक्षा केंद्रावर सावळागोंधळ उडाल्याची माहिती उमेदवारांनी दिली. परीक्षा 10 वाजता सुरु होणे अपेक्षित असताना पाऊणे अकरा वाजता परीक्षा सुरु झाली. परीक्षा केंद्रावर सुरवातीला लाग ईन होत नव्हते. त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती होती. मात्र, तरीही केंद्रावरील कोणताही परीक्षक माहिती देण्यासाठी उपस्थित नव्हता. परीक्षेच्या केंद्रावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. खुर्च्या तुटलेल्या अवस्थेत होत्या. उमेदवार स्वतः आपली व्यवस्था करत होते. कोणीही कुठेही बसत होेते, तर काही ठिकाणी मोबाईल वापरण्यात येत होता. त्यामुळे परीक्षेच्या विश्‍वासाहर्तेवर प्रश्‍न चिन्ह उपस्थित होत आहेत, असेही उमेदवारांनी सांगितले.