Sun, Jul 21, 2019 07:47होमपेज › Pune › मावळ फेस्टिवलमुळे ग्रामीण भागात सांस्कृतिक चळवळीची निर्मिती

मावळ फेस्टिवलमुळे ग्रामीण भागात सांस्कृतिक चळवळीची निर्मिती

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 24 2017 11:55PM

बुकमार्क करा

वडगाव मावळ : वार्ताहर 

गेल्या दहा वर्षांपासून संपन्न होणार्‍या मावळ फेस्टिवल सोहळ्यामुळे ग्रामीण भागात सांस्कृतिक चळवळ निर्माण करुन ती टिकविण्याचे महत्वपूर्ण कार्य घडत असल्याचे मत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील  यांनी व्यक्त केले.

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणामध्ये सुरु असलेल्या मावळ फेस्टिवल या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी, माजी मंत्री मदन बाफना,माजी आमदार दिगंबर भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय(बाळा) भेगडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, गणेशआप्पा ढोरे, प्रशांत ढोरे, बाबुराव वायकर, अविनाश बवरे, चंद्रशेखर भोसले, सोपानराव म्हाळसकर, संभाजी म्हाळसकर, अशोक बाफना, रविंद्र दाभाडे, जितेंद्र बोत्रे, सुनिल ढोरे, पंढरीनाथ ढोरे, फेस्टिवलचे संस्थापक प्रवीण चव्हाण, अध्यक्ष शाम ढोरे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी, मावळ फेस्टिवलच्या वतीने माजी मंत्री बाफना यांना पगडी, शाल, श्रीफळ व मानपत्रासह जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाफना यांनी यावेळी बोलताना हा माझ्या गावातला, घरातला सन्मान असल्याचे मत व्यक्त करुन सत्कार स्विकारला.

खासदार बारणे यांनी गेली दहा वर्षे सांस्कृतिक चळवळीचे सातत्य टिकवून ठेवलेल्या मावळ फेस्टिवलचे विशेष कौतुक केले, आ. भेगडे यांनीही आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त करुन फेस्टिवलला मदत करण्याचे स्पष्ट केले.उद्घाटन सोहळ्यानंतर आयोजीत केलेल्या सिनेअभिनेते भाऊ कदम यांची विनोदी भुमिका असलेल्या शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकाचा प्रेक्षकांनी आनंद लुटला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक प्रवीण चव्हाण यांनी केले.

पालकमंत्र्यांकडून 25 लाखांचा निधी !

दरम्यान, या सोहळ्याचे उद्घाटक पालकमंत्री गिरिष बापट हे कार्यक्रमास उपस्थित राहू न शकल्याने आमदार भेगडे यांनी त्यांच्याकडे प्रत्यक्ष नाही परंतु अप्रत्यक्ष भेट देण्याची विनंती केली असता पालकमंत्री बापट यांनी गैरहजेरीच्या बदल्यात वडगावच्या कुठल्याही विकासकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून 25 लाख रुपये देण्याचे कबूल केले व त्याबाबतची घोषणा दिलीपराव वळसेपाटील यांनी यावेळी बोलताना केली.