Thu, Jan 17, 2019 02:04होमपेज › Pune › पिंपरीत 'टाटा कॅपीटल'च्या कार्यालयाची तोडफोड

पिंपरीत 'टाटा कॅपीटल'च्या कार्यालयाची तोडफोड

Published On: Jan 20 2018 12:52PM | Last Updated: Jan 20 2018 12:52PMपिंपरी : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळणार्‍या घरांसाठी कर्ज मिळवून देतो, असे सांगत फसवणूक केल्याचा आरोप करत जमावाने टाटा कॅपीटलच्या कार्यालयाची तोडफोड केली. संतप्‍त जमावाने येथे टाटा कॅपीटल फायनान्सच्या स्‍टॉलवर जाऊन सेल्स काऊंटरची संतप्त जमावाने तोडफोड केली. हा प्रकार पिंपरी येथील ऍटोक्लस्टर येथे शनिवारी सकाळी आकराच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी येथील ऍटोक्लस्टर येथे टाटा फायनान्स कंपनीने कर्जसाठी स्टॉल उभा केले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे दिली जातील असे सांगितले, तसेच या योजनेअंतर्गत मिळणार्‍या घरासाठी कर्ज उपलब्ध करुन देतो असे सांगण्यात आले. मात्र, यावेळी आमची फसवणूक होत असल्याचा आरोप करत संतप्त जमावाने तोडफोड केली. या ठिकाणी पिंपरी पोलिस दाखल झाले आहेत.