Sat, Jun 06, 2020 19:04



होमपेज › Pune › वारीत चोरट्यांचा धुमाकूळ

वारीत चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Jul 11 2018 1:48AM | Last Updated: Jul 11 2018 1:38AM



पुणे : प्रतिनिधी

शहरात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळ्यात पादुका दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांना मंगळसूत्र चोरट्यांनी लक्ष केले आहे. याप्रकरणी हडपसर भागात दोन महिलांच्या तर वानवडीत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याच्या घटना घडल्या आहेत.   यात 85 हजारांचा माल जप्त केला आहे. 

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  23 वर्षीय महिला या हडपसर परिसरात आलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अविरत क्‍लासेसजवळ आल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील 25 हजाराचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांने पळविले. तर, दुसर्‍या घटनेत नालबंद चाळीसमोर पालखी आल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या 50 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 20 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले.

वानवडीतही  38 वर्षीय महिलेचे  मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली. भौरोबानाला चौकात हा प्रकार सोमवारी सकाळी उघड झाला आहे.  यप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भैरोबानाला येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी अज्ञाताने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी अधिक तपास वानवडी पोलिस करत आहेत.