Thu, Nov 15, 2018 23:03होमपेज › Pune › तीन वर्षांच्या बालिकेवर  चुलत भावाचा अत्याचार

तीन वर्षांच्या बालिकेवर  चुलत भावाचा अत्याचार

Published On: Apr 10 2018 1:40AM | Last Updated: Apr 10 2018 1:32AMदेहूरोड : वार्ताहर

अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या बालिकेला खाऊचे अमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार रावेतजवळ  वस्तीवर घडला. अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा नववीत शिकत असून पीडित बालिकेचा चुलतभाऊ आहे. 

देहूरोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरूण मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे तिची आई आपल्या अन्य दोन मुलांसह रावेतजवळ आपल्या माहेरी राहत आहे. शुक्रवारी पीडित बालिका अंगणात खेळत होती. शेजारी राहणार्‍या तिच्या चुलत भावाने खाऊचे आमिष दाखवून तिला निर्जनस्थळी नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले.    

घटनेनंतर पीडित बालिका रडू लागल्यामुळे तिच्या आईने तिकडे धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला. तिने पोलिस ठाण्यात धाव घेऊन सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. त्यावरून संबंधित अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक अरूण मोरे याप्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

Tags : pune, pune,news, crime, child, atrocity,