होमपेज › Pune › कॉसमॉस बँक दरोडा प्रकरण : राज्यात तब्बल ४२८ एटीएम कार्डचा वापर

कॉसमॉस बँक दरोडा प्रकरण : राज्यात तब्बल ४२८ एटीएम कार्डचा वापर

Published On: Aug 28 2018 1:36AM | Last Updated: Aug 28 2018 12:54AMपुणे : प्रतिनिधी

कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर हल्ला करून हॅकर्सनी दरोडा टाकत 95 कोटींची रोकड पळविल्याप्रकरणात हॅकिंग वेळेत राज्यात 428 एटीएम कार्डचा वापर झाला. त्यापैकी पुण्यात पावणे दोनशे कार्ड पुणे शहरातून वापरून अनेकांनी पैसे काढले असून, यातील 7 जणांकडून साडेतीन लाख रुपये आतापयर्र्ंत जमा करण्यात आले आहेत. 41 शहरांमधून हे पैसे काढण्यात आले आहेत. 

गणेशखिंड रोडवरील कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर हॅक करून 94 कोटी 42 लाख रुपयांवर हॅकर्सनी दरोडा टाकला आहे. याप्रकरणी व्यवस्थापकीय संचालक सुहास सुभाष गोखले (वय 53, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा प्रकार 11 ते 13 ऑगस्ट या कालावधीत घडला आहे.  देशभरातील 41 शहरांमध्ये 71 बँकांच्या एटीएम सेंटरमधून 2 कोटी 50 लाख रूपये काढण्यात आले आहेत.

राज्यात 428 एटीएम कार्डचा वापर झाला आहे. त्यापैकी  पुण्यात 171 एटीएम कार्डधारकांनी पैसे काढले गेले आहेत.   आत्तापर्यंत 7 जणांकडून 3 लाख 55 हजार रुपये जप्त केले आहेत. पुण्यातील एकाने 16 हजार, तर नंदुरबार येथील एकाने 99 हजार रुपये पोलिसांकडे जमा केले आहेत. त्यातही हॅकरेन बँकेत पैसे जमा केल्यानंतर कोणत्याही खातेदाराला 99 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता आलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.