होमपेज › Pune › नगरसेवक कामठे यांना जिवे मारण्याची धमकी

नगरसेवक कामठे यांना जिवे मारण्याची धमकी

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 23 2018 1:23AMपिंपरी : प्रतिनिधी

नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन, अनधिकृत फ्लेक्सविरुद्ध केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी एकाने दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. याविरोधात नगरसेवक तुषार गजानन कामठे यांनी बुधवारी (दि. 21) सांगवी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, एकुमसिंग कोहली (रा. दापोडी) याने अनेक वेळा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. सातत्याने अनधिकृत फ्लेक्सविरुद्ध आम्ही उचलले पाऊल थांबविण्यासाठी तो असे करत होता. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कामठे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. 

शहरभर अनधिकृत फ्लेक्स लागल्याचे दिसते. त्यावर नगरसेवक तुषार कामठे यांनी त्यांच्या वॉर्डातील अनधिकृत फ्लेक्सच्या विरोधात मोहीम उघडली. कामठे यांनी स्वतः तीन वेळा फ्लेक्स काढले. एकदा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर वाहनांमध्ये भरून आणलेले फ्लेक्स आणून टाकले होते.  

दरम्यान, आयुक्तांना अनधिकृत फ्लेक्स काढण्यासंदर्भात निवेदन दिले होते. महानगरपालिकेसमोर फ्लेक्स आणून टाकल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी पिंपळे निलख परिसरात अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली. कामठे यांनी डीपी रोडला लावलेल्या फ्लेक्स मालकाला आदेशाची प्रत मागितली होती; परंतु ती प्रत न देता त्यांच्या कार्यालयात जाऊन आणि फोनवर शिवीगाळ केली.