Sun, Jan 20, 2019 09:06होमपेज › Pune › पिंपरी : महिलेवर खुनी हल्ला प्रकरणी नगरसेविकेच्या पतीला अटक

पिंपरी : महिलेवर खुनी हल्ला प्रकरणी नगरसेविकेच्या पतीला अटक

Published On: Jun 16 2018 11:15AM | Last Updated: Jun 16 2018 11:14AMपिंपरी : प्रतिनिधी

एचए कॉलनी येथील महिलेवर दोघा अज्ञाताकडून खुनी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी प्रमुख आरोपी अँड. सुशील मंचरकर यांना पोलिसांनी शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी गवळीमाथा येथून अटक केली.

या आठवड्यात पिंपरी एचए कॉलनी येथे एका महिलेवर गोळीबार झाला होता. त्या महिलेने २०१४ मध्ये मंचरकर यांच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दिली होती. गोळीबार प्रकरणी खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली. मंचरकर यांना मोक्काच्या गुन्हयात जामीनाबाबत उच्च न्यायालयात १८ जून रोजी सुनावणी आहे. त्यानंतर मंचरकर हे गवळीमाथा येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी सुरेंद्र आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक गणेश पाटील. पोलिस कर्मचारी स्वप्नील शिंदे, सुरेन्द्र आव्हाड यांनी मंचरकर यांना गवळीमाथा येथून अटक केली.

सुशील मंचरकर हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती आहेत. तुरूंगातील आरोपी पळवून लावणे, कामगार नेते कैलास कदम यांच्या हत्येचा कट रचणे, असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. या गुन्हयांमध्ये त्यांना मोक्का लावण्यात आला आहे.