Fri, Feb 22, 2019 15:39होमपेज › Pune › अकरावी प्रवेशाचे ‘कॉलसेंटर’ होणार सुरू

अकरावी प्रवेशाचे ‘कॉलसेंटर’ होणार सुरू

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 24 2018 12:31AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या अकरावीची ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, बायफोकल अर्थात व्दिलक्षी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ही प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर अकरावीच्या नियमित फेर्‍यांना सुरूवात होणार आहे. यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अकरावी प्रवेशाचे कॉलसेंटर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यातील चार कंपन्या तांत्रिकदृष्ट्या पात्र झाल्या असून, यातील एका कंपनीची निवड करण्यात येणार आहे. या कंपनीमार्फत येत्या बुधवारी किंवा गुरूवारी कॉलसेंटर सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सुत्रांनी दिली.

शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत कंपनीची निवीदा कमी रकमेची आहे त्यांना संधी देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 सीटर कॉलसेंटर सुरू करण्यात येणार असून, आवश्यकता असल्यास ते 100 सीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या कॉलसेंटरसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. यातील चार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडून कॉलसेंटरच्या स्वरूपाबाबतचे सादरीकरण केले जाईल. त्यानंतर एका कंपनीची निवड करण्यात येईल आणि प्रत्यक्षात कॉलसेंटर सुरू होईल. - गंगाधर म्हमाणे, संचालक, माध्यमिक शिक्षण संचालनालय