Tue, Jul 16, 2019 00:00होमपेज › Pune › शहांचा पुरंदरेशी संपर्क फॉर समर्थन

शहांचा पुरंदरेशी संपर्क फॉर समर्थन

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 09 2018 1:08AMपुणे : प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी रात्री शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे 45 मिनिटे विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी पुरंदरे यांनी शहा यांना शिवसृष्टी पाहण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे.अमित शहा यांनी मुंबई दौर्‍यामध्ये संपर्क फॉर समर्थन’ अशी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत अभिनेत्री माधुरी दीक्षित, उद्योजक रतन टाटा यांची  भेट घेतली आहे. तर गायिका लता मंगेशकर यांची नियोजित भेट रद्द झाली होती. रविवारी शहा पुणे दौर्‍यावर होते. दिवसभर त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. 

भेटीनंतर बाबासाहेब पुरंदरे यांनी माध्यमंशी संवाद सांधला. ते म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहनी पुरंदरे वाड्याला भेट देणे ही खुप मोठी बाब असून, गेल्या चार वर्षांमध्ये देशात आणि राज्यामध्ये भाजप सरकराने केलेल्या विकासकामांचा अहवाल शहानी पुरंदरेना दिला. राज्यशासनाने कात्रज-मुंबई महामार्गावरील शिवशाहीर बाबासाहेब पुरदरे यांच्या शिवसृष्टीला मंजुरी देत 300 कोटी रुपयांचे आर्थिक साह्य मंजूर करुन सांस्कृतिक आणि पर्यटन दर्जा जाहीर केला आहे. त्यामुळे ही शिवसृष्टी पुर्ण झाल्यानंतर ते पाहण्याासठी यावे, असे निमंत्रण पुरंदरे यांनी अमित शहा यांना दिले आहे. त्यानंतर शहा यांनी निमंत्रण स्विकारल्याचे सांगितले. यावेळी भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार विनय शस्त्रबुद्धे, आमदार माधुरी मिसाळ यांची उपस्थिती होती.