खडकी : वार्ताहर
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या एका अधिकार्याच्या बंगल्याच्या बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी बोर्डाच्या पाण्याचे टँकर वापरण्यात येते. पाणी टँकर द्वारे हद्दीच्या बाहेर पाणीपुरवठा करण्यास बंदी असताना देखील अधिकाराचा गैरवापर करीत पाणीपुरवठा करण्यात येतो आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बबलू पोलकम यांनी केली आहे.
बोर्डातील आरोग्य विभागाचे अधिकारी विलास खांदोडे यांच्या बंगल्याचे काम धानोरी परिसरामध्ये सुरु आहे. बंगल्याच्या बांधकामासाठी पाण्याचे टँकर मधून पाणी पुरविण्यात येत असते. तसेच काही कर्मचारी त्या बंगल्याच्या कामासाठी वापरण्यात येत असल्याचे पोलकम यांनी सांगितले. बोर्ड प्रशासनाच्या पाण्याच्या टँकर द्वारे केवळ बोर्डाच्या हद्दीमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र तरी देखील हद्दीबाहेरील बंगल्याच्या कामासाठी पाण्याच्या टँकरचा उपयोग केला जात असल्याचे पोलकम यांनी सांगितले
लहान टाकीसाठी 400 रुपये तर मोठ्या टाकी द्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. नागरिकांना पाण्याची टाकी हवी असल्यास पैसे बोर्ड प्रशासनाच्या तिजोरीत भरावे लागतात. मात्र हे पाण्याचे टँकर अधिकारी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या बंगल्याच्या बांधकामासाठी पाणी वापरण्यात येत असल्याचे पोलकम म्हणाले.
बंगल्याच्या बांधकामासाठी बोर्डातील पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची तक्रार पोलकम यांनी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर धीरज मोहन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमोल जगताप यांच्याकडे केली आहे.
या प्रकरणात संपूर्ण सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान सीईओ जगताप आणि बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. याबाबत दरम्यान बोर्डाचे आरोग्य अधीक्षक खांदोडे यांच्याशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.