Sun, Jul 21, 2019 07:52होमपेज › Pune › लोकशाही टिकण्याचे श्रेय काँग्रेसचे  : नाना पाटेकर 

लोकशाही टिकण्याचे श्रेय काँग्रेसचे  : नाना पाटेकर 

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 1:38AMपुणे : प्रतिनिधी

आजकाल अनेकजण म्हणतात कि, या पक्षाने काय केलय, त्या पक्षाने काय केलय? काँग्रेसने काय केलय. काँग्रेसच्या काळात काहीच झालं नाही अस म्हणून चालणार नाही. लोकशाही टिकून आहे हे कमी आहे का? असे म्हणत लोकशाही टिकण्याचे श्रेय ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काँग्रेसला दिले.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथील नाम फाऊंडेशनच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नाना बोलत होते. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित होते. नाना म्हणाले, कोण काय करत हे सगळ्यांना माहीत आहे. राजकारणी झुंजवतात आणि आम्ही झुंजतो. आमचे शिक्षण कुठे जाते? बाकीच्या देशात काय परिस्थिती आहे हे बघतच आहोत. त्यामुळे आपण वेळीच हुशार व्हायला हवे. तसेच हमीभाव हे निवडणुकीचे आश्वासन नसून, तो शेतकर्‍यांचा हक्क आहे. तो त्यांना मिळायला हवा. शेतकार्‍यांची दीडपट हमीभावाची मागणी रास्त आहे. सातवा वेतन आयोग जसा सरकारी कर्मचार्‍यांना मिळायला हवा. त्याप्रमाणेच शेतकर्‍यांनाही त्यांच्या पिकाला हमीभाव मिळायलाच पाहिजे.

न्यायालयासमोर सर्वजण समान आहेत. त्यामुळे त्याबद्दल काही वक्तव्य करणं योग्य होणार नाही. ज्याप्रमाण एखाद्याला शिक्षा होताना विचारले जाते. त्याचप्रमाणे त्याव्यक्तीचा सन्मान का होतो आहे का, हे देखिल विचारले गेले पाहिजे. मी करत असलेल्या सामाजिक कामामुळे मला मला पद्मश्री नको, तर ‘नाम’ला पद्मश्री हवा. नाम हे आमचे कुटूंब आहे, असे नाना म्हणाले. सध्या सगळीकडे बेरोजगारी वाढत आहे. पुढच्या काळातही नोकर्‍या वाढतील याची शक्यता कमी आहे. शेती हा पुढच्या काळात रोजगार देणारा व्यवसाय असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार पंतप्रधान व्हायलाच हवेत

शरद पवार पंतप्रधान व्हायला हवेत. त्यांचा राजकीय अनुभव प्रचंड मोठा आहे. त्यांनी केंद्रात अनेक मंत्रीपदेही भुषविली आहेत. ते पंतप्रधान होता होता राहिले. देवेगौडा वगैरे अनेकजण पंतप्रधान झाले. शरद पवार पंतप्रधान झाले पाहिजेत. शरदराव हे पूर्वीच पंतप्रधान व्हायला पाहिजे होते.    - नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते