Wed, Jul 24, 2019 05:42होमपेज › Pune › सोशल मीडियावरील संदेशांना उत्तरासाठी काँग्रेस सरसावली

सोशल मीडियावरील संदेशांना उत्तरासाठी काँग्रेस सरसावली

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 24 2018 10:10PMपिंपरी : मिलिंद कांबळे

सध्या सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या फेर्‍या जोरात झडत आहेत. कोणतेही बाब किंवा घटना काही सेकंदात देशभरात पसरवली जाते. या क्षेत्राची प्रत्यक्ष शक्तीचा फायदा हेरत भारतीय जनता पक्षाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता काबीज केली आहे. आता त्याच वळणावर काँग्रेसने आपले मार्गक्रमण सुरू केले आहे. सोशल मीडियावरही अधिक गांभीर्याने लक्ष देण्याच्या दृष्टी शहर काँग्रेसने पावले उचलली आहेत. राज्यात आणि देशात काँग्रेसने पूर्वी केलेल्या कामांबाबत गोष्टी माहिती देऊन लोकांमध्ये संभ्रम पसरविला जात आहे. सततच्या या मारामुळे काँग्रेस बॅकफूटवर जात आहे. मोठ्या प्रमाणात असे छायाचित्र, व्हिडिओ आणि संदेश व्हायरल होत असल्याने नागरिकांचाही त्यांच्यावर विश्‍वास बसत आहे. परिणामी, काँग्रेसची प्रतिमा मलिन होत आहे. 

लोकसभा, विधानसभा, महापालिका तसेच, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा पुरेपुरे वापर करीत मतदारांना प्रभावीत केले होते. त्याच बळावर भाजपने नागरिकांची मते आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले. केंद्र, राज्य व शहर पातळीवर विशेष टीम तयार करून भाजपने सोशल मीडियावर अक्षरश: वर्चस्व मिळविले आहे. परिणामी, पक्ष, संलग्न संस्था आणि त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचंड नियंत्रण मिळविले आहेत. 

भाजपच्या या प्रचाराला समर्थपणे विरोध करण्यासाठी आता काँग्रेसही सरसावली आहे. त्यासाठी ‘प्रोजेक्ट शक्ती अ‍ॅप’ नुकतेच शहरात कार्यान्वित करण्यात आले आहे. भाजपकडून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु असलेल्या भाजपच्या खोट्या प्रचाराला काँग्रेसकडून या अ‍ॅपद्वारे प्रत्युत्तर दिले जात आहे. त्याद्वारे काँग्रेसच्या पदाधिकारी, सदस्य, साधा कार्यकर्त्या किंवा कोणत्याही सामान्य नागरिकांला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी थेट संपर्क साधता येत आहे. काँग्रेसची ध्येय धोरणे, चालू घडामोडींवरील पक्षाची अधिकृत भूमिका यातून  नागरिकांपर्यंत तात्काळ पोहचवली जात आहेत.  या अ‍ॅपचे अनावरण संभाजीनगर, चिंचवड येथील काँग्रेसच्या मेळाव्यात नुकतेच करण्यात आले. या संदर्भात माहिती काँग्रेस पदाधिकारी, सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. त्याचा वापराबाबत सविस्तर माहितीही दिली गेली आहे. शहरातील अधिकाधिक नागरिकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याबाबत कार्यकर्ते सरसावले आहेत.

भाजपने केलेल्या आरोपासंदर्भात काँग्रेसने मांडलेले तथ्य बाजू तात्काळ या अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. ही माहिती फेसबुक, व्हॅट्स अ‍ॅप, ट्वीटर, इन्स्टाग्राम आदींसह इतर सोशल मीडियावर पसरविण्यात येत आहे. त्याबाबत शहर पातळीवर विशेष टीम तयार करण्यात आली आहे. 

शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या ‘प्रोजेक्ट शक्ती अ‍ॅप’शी कनेक्ट व्हावे, यासाठी विशेष धोरण आखण्यात आले आहे. त्या दृष्टीने पदाधिकारी कार्यरत झाले आहेत. काँग्रेसच्या विविध आघाड्यांना सूचना दिल्या आहेत. त्या दृष्टीने सर्व शहर पदाधिकारी व्यस्त झाल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावरील लढाईत काँग्रेसला कितीपत यश मिळते, हे येणार्‍या काळ्यात स्पष्ट होणार आहे.