Wed, May 22, 2019 16:40होमपेज › Pune › 'भाजपमध्ये लोकप्रतिनिधींना किंमत नाही'; काँग्रेसची सायकल रॅली  

'भाजपमध्ये लोकप्रतिनिधींना किंमत नाही'; काँग्रेसची सायकल रॅली  

Published On: Jan 30 2018 2:00PM | Last Updated: Jan 30 2018 2:00PMपिंपरी : प्रतिनिधी
भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा आणि आरएसएस च्याच आदेशाची अंमलबजावणी होते त्यांच्याच खासदार, आमदार, नगरसेवकांना ते किंमत देत नाहीत हे दुर्दैव आहे. जनतेच्या मताचा अनादर करणाऱ्या भाजप सरकारला घरी बसवा, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी येथे केले. 

पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने आज भक्ती शक्ती निगडी ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. पिंपरी चौकात सभेने रॅलीचा समारोप झाला. त्या वेळी साठे बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष साठे म्हणाले, 'सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने पेट्रोल ,गॅस दरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही भारतात तेलाच्या किमती वाढत आहेत सरकार अंबानी ,अडणींच्या हिताचेच निर्णय घेत आहे कामाऐवजी जातीजातीत तेढ निर्माण करत आहे.'

सरकारने शेतकऱ्यांनाया दिलेली कर्जमाफी फसली आहे भाजपमध्ये त्यांच्याच खासदार ,आमदार ,नगरसेवकांना किंमत नाही मोदी ,शहा आणि आरएसएस च्याच आदेशाची अंमलबजावणी केली जाते. खासदार नाना पटोले यांनी याविरोधात आवाज उठवला पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरू असलेल्या सावळे का सावळ्या गोंधळा बाबत त्यांचेच खासदार अमर साबळे बोलत आहेत त्यांच्याच एका नगरसेवकाला अनधिकृत फ्लेक्सबाबत आंदोलन करण्याची वेळ आली म्हणूनच भाजपला आता सत्तेवर राहण्याचा अधिकार उरला नसल्याची टीका साठे यांनी केली.

या वेळी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, शहर महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, संग्राम तावडे, सुदाम ढोरे, लक्ष्मण रुपनर, मयूर जयस्वाल, नरेंद्र बनसोडे, उमेश खंदारे, विशाल कसबे, संदेश नवले, आबा खराडे, शोभा मिरजकर आदी उपस्थित होते.