Fri, May 24, 2019 09:21होमपेज › Pune › मतदार संघांच्या जागांसाठी आघाडीत खेचाखेची सुरू

मतदार संघांच्या जागांसाठी आघाडीत खेचाखेची सुरू

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:42AMपुणे : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकानां अद्याप वर्षभराचा अवधी असताना काँग्रेस- राष्ट्रवादीत मतदारसंघाच्या जागांची खेचाखेची सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी या दोन्ही काँग्रेसमध्ये जागा वाटपांचा कलगीतुरा रंगणार आहे. 

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात अजित पवार यांनी पुणे लोकसभेची जागा काँग्रेस राष्ट्रवादी लढविणार असल्याचे जाहीर केले. आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसकडे होती. आगामी निवडणुकीत आघाडी झाल्यास काँग्रेस या जागेवर हक्क सांगणार असल्याचे स्पष्ट आहे. 

मात्र, आता या जागेवर राष्ट्रवादीने  हक्क सांगितल्याने काँग्रेस मध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी आम्ही बारामती लोकसभा निवडणूक लढवू असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात दोन्ही काँग्रेसमध्ये युद्ध सुरू झाले आहे.

लोकसभा निवडणुकीला 10-12 महिन्यांचा अवधी आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रयत्नशील असतानाच पुण्याचा जागेचा मुद्दा काढून अजित पवार यांनी त्यास सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे.  आता निवडणुकीच्या आधी दोन्ही पक्ष जागा वाटपावरून एकमेकांच्या विरोधात उभे  ठाकणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी अशी अवस्था दोन्ही काँग्रेसची झाली आहे.