Wed, Nov 21, 2018 01:35होमपेज › Pune › राष्ट्रवादीच्या माजी आमदार आणि नगरसेवकामध्ये हाणामारी

राष्ट्रवादीच्या माजी आमदार आणि नगरसेवकामध्ये हाणामारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्यात हाणामारी झाली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चाफेकर चौकात हा प्रकार घडला. दोघांनी चिंचवड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्राधिकरण नवनगरच्या कार्यलायवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चास माजी आमदार बनसोडे आणि माजी नगरसेवक पवार हे दोघे स्वतः व त्यांचे कार्यकर्ते घेऊन गेले होते. मोर्चा सुरू असताना दोघांमध्ये वाद झाला. या वादामुळेच मोर्चा संपवून परत जात असताना चाफेकर चौकात तुफान हाणामारी झाली अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली.