Tue, Jul 16, 2019 22:01होमपेज › Pune › २० लाख टन ऊस गाळप पूर्ण

२० लाख टन ऊस गाळप पूर्ण

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 12:44AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात 16 कारखान्यांकडून चालू वर्षीच्या 2017-18 च्या ऊस गाळप हंगामाने चांगलाच वेग घेतला आहे. सद्य:स्थितीत 20 लाख 26 हजार 985 टन गाळप पूर्ण झालेले आहे, तर 9.61 टक्के उतार्‍यानुसार 19 लाख 48 हजार 375 क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आलेले आहे. 

जिल्ह्यात 10 सहकारी आणि 6 खासगी कारखान्यांकडून ऊस गाळप जोमाने सुरू झालेले आहे. जिल्ह्यात 1 डिसेंबरपर्यंत झालेल्या सर्वाधिक ऊस गाळपात बारामती अ‍ॅग्रो या खासगी कारखान्याने अग्रस्थान पटकावले आहे. या कारखान्याने सर्वाधिक म्हणजे 2 लाख 52 हजार 260 टन इतके गाळप पूर्ण केलेले आहे. तसेच 9.63 टक्के उतार्‍यानुसार सर्वाधिक म्हणजे 2 लाख 43 हजार 50 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. पराग अ‍ॅग्रो कारखान्याने सर्वात कमी म्हणजे 10 हजार 723 टन ऊस गाळप पूर्ण करून 3 हजार 800 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. हा कारखाना उशिराने म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी सुरू झाला आहे. सहकारी साखर कारखान्यांमध्ये राजगड कारखान्याने 28 हजार 845 टन ऊस गाळप पूर्ण केले असून 7.63 टक्के उतार्‍यानुसार 22 हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. 

जिल्ह्यात 1 डिसेंबरपर्यंत कारखानानिहाय झालेले ऊस गाळप टनांत पुढीलप्रमाणे. ः सोमेश्‍वर सहकारी 17,0850, माळेगाव 82,580, छत्रपती 10,3632, भीमा पाटस 44,550, विघ्नहर 18,2280, इंदापूर 17,0350, राजगड 28,845, संत तुकाराम 10,6940, घोडगंगा 14,9940, भीमा शंकर 14,0640, निरा-भीमा सहकारी 12,2540. खासगी कारखान्यांमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा 9,0385, अनुराज शुगर्स 9,8200, बारामती अ‍ॅग्रो 25,2260, दौंड शुगर 16,6310, व्यंकटेशकृपा शुगर 10,6140, पराग अ‍ॅग्रो 10,723 आदींचा समावेश आहे.

राज्यात 166 लाख टन ऊस गाळप पूर्ण

राज्यात 94 सहकारी आणि 77 खासगी मिळून एकूण 171 कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. दैनिक 5 लाख 54 हजार 400 टन ऊस गाळप पूर्ण होत आहे. त्यातून 1 डिसेंबरअखेर 166.55 लाख टन ऊस गाळप पूर्ण झालेले आहे, तर 9.31 टक्के उतार्‍यानुसार 154.99 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आल्याचे साखर आयुक्तालयातील  सहसंचालक (विकास) कार्यालयाकडून सांगण्यात आले.