Sun, Nov 18, 2018 19:49होमपेज › Pune › बीएस थ्री दुचाकींची विक्री केल्याची मोदींकडे तक्रार

बीएस थ्री दुचाकींची विक्री केल्याची मोदींकडे तक्रार

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 11:54PMपिंपरी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणकारी बीएस थ्री वाहनांवर 31 मार्च 2017 नंतर विक्रीस बंदी घातली आहे, तरीही चिंचवड येथील टीव्हीएस वाहन वितरक शो-रूममधून या वाहनांची पूर्वीच्या तारखेने विक्री करण्यात आली. या प्रकारात शासनाची फसवणूक झाली असून, यामध्ये आरटीओ कार्यालय सहभागी असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजेश रोचीरामानी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘पीएमओ’ पोर्टलवर केली आहे. या प्रकरणाची पोलिसांच्या सायबर सेलकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

संबंधित शो-रूममधून 350 हून अधिक बीएस थ्री दुचाकींची विक्री 31 मार्च 2017 नंतर करण्यात आली आहे. त्यातील 94 दुचाकींची माहिती रोचीरामानी यांना प्राप्त झाली. केवळ  पावतीच्या आधारावर दुचाकींचे आरटीओमधून पासिंग करून घेण्यात आले आहे. 

खोट्या तारखांचा सर्रास वापर झाला असून, मोटार कायद्यानुसार 15 दिवसांत वाहन नोंदणी आवश्यक आहे; मात्र या शो-रूममधून 3 ते 4 महिन्यांनंतरही 31 मार्च 2017 च्या दुचाकींची नोंदणी करण्यात आली आहे. ही नोंदणी शो-रूमचे मालक व नातेवाईक, नोकर्‍यांच्या नावाने केली गेली आहे, असे रोचीरामानी यांनी तक्रारीत म्हटले आहे.