Tue, Jul 23, 2019 07:05होमपेज › Pune › आयुक्तालयात किऑस्क सेंटर सुरू

आयुक्तालयात किऑस्क सेंटर सुरू

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 12:01AMपुणे : प्रतिनिधी 

नागरिकांमध्ये महाराष्ट्र पोलिस सीटिझन पोर्टलच्या विविध सेवांची माहिती देण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या किऑस्क सेंटरचे उद्घाटन पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या आवारातील गेट क्रमांक तीनशेजारी हे किऑस्क सेंटर उभारण्यात आले आहे. 

यावेळी अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, अपर पोलिस आयुक्त साहेबराव पाटील, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, डॉ. प्रवीण मुंढे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पोलिस दलातर्फे ‘एमएचपोलिस.महाराष्ट्र.जीओव्ही.इन’ या वेबसाईटवर सिटीझन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या किऑस्क सेंटरच्या माध्यमातून ई तक्रार, तक्रारीची सद्यस्थिती, हरविलेल्या व्यक्ती, अटक आरोपी, फरार आरोपी, विविध उत्सव परवाने, मोबाईल मिसींग, एफआयआर आदींची माहिती घेता येणार आहे.