Fri, Nov 16, 2018 13:26होमपेज › Pune › आयुक्‍त २४  दिवस सुटीवर

आयुक्‍त २४  दिवस सुटीवर

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:12AMपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवार (दि.11)  ते 3 जून या कालावधीत सुटी घेतली आहे. या कालवधीत ते परदेश दौर्‍यावर जाणार आहेत. त्याचा खर्च ते स्वत: करणार आहेत.  आयुक्त हर्डीकर यांनी 23 दिवसांची रजा मिळावी, असा अर्ज पालिकेकडे व राज्य शासनाकडे केला होता. त्यास मान्यता मिळाली असून ते शुक्रवारपासून रजेवर जाणार आहेत. त्यानंतर ते थेट सोमवारी (दि.4 जून) पालिकेत हजर होणार आहेत. सुटीमध्ये ते अमेरिकेच्या खासगी दौर्‍यावर जाणार आहेत.  आयुक्तांच्या रजेच्या काळात त्यांच्या पदाचा कार्यभार पीएमआरडीचे आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे दिला आहे. यापुर्वीही आयुक्त रजेवर असताना त्यांचा पदभार गित्ते यांच्याकडे दिला होता. मात्र, त्या काळात एकही दिवस गित्ते पालिकेत फिरकले नव्हते.