Wed, Nov 21, 2018 13:17होमपेज › Pune › दोन हजारांची लाच घेताना लिपिक अटकेत

दोन हजारांची लाच घेताना लिपिक अटकेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी  : प्रतिनिधी

दोन हजार रुपयांची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी गावातील करसंकलन विभागातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. सदनिकेचे हस्तांतरण करून कर पावती देण्यासाठी त्याने लाच मागितली होती. ही कारवाई सोमवारी (दि.२६) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली. 

अमोल चंद्रकांत वाघिरे (वय ३८, रा. धोंडिबा वाघिरे चाळ, पिंपरी गावठाण, पिंपरी)  असे कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. याबाबत ४५ वर्षीय एका व्यक्तीने तक्रार दिली होती. 

तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावाने सदनिका घेतली आहे. ती सदनिका पत्नीच्या नावाने हस्तांतरण करून कर पावती देण्यासाठी आरोपीने २ हजार रुपये मागितले होते. याबाबत लाचलुचपत विभागाच्या पुणे विभागाने कारवाई केली. दोन हजारांची लाच स्वीकारताना पिंपरी गावातील कार्यालयात कनिष्ठ लिपिकास पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक एस. एस. घार्गे, दत्तात्रय भापकर, पोलिस हवालदार खान, विनोद झगडे यांच्या पथकाने केली.

Tags : Pimpari Chinchwad Municipal Carporation, Cleark, Curraption, Pune, Arrested


  •