Wed, Nov 21, 2018 13:17होमपेज › Pune › तोंडातील घास हिसकाविणारे सरकार : बाबर

तोंडातील घास हिसकाविणारे सरकार : बाबर

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 14 2018 11:34PMकोंढवा : वार्ताहर

अच्छे दिनच्या नावाखाली सर्वसामान्यासह शेतकर्‍यांच्या गळ्यात फास टाकला. आता मोलमजूरी करणारे व साफई करणार्‍या कामगारांना पगार न देता रस्त्यावर आणण्याचे काम सरकार आणि पालिका करत असून, बेरोजगारी वाढवत आहे. राज्यासह देशाचे वाटोळे झाले आहे. यापुढे शिवसेना हे खपवून घेणार नाही. असा खणखणी इशारा शहर प्रमुख माजी आमदार महादेव बाबर यांनी दिला आहे.

गेली 4 महिने सफाई कामगारांना पगार न मिळालेच्या निषेधार्थ राज्य सरकार महापालिकेचा निर्दशने करून निषेध कोंढवा खुर्द ज्योती चौक येथे शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. त्यावेळी शहरप्रमुख बाबर बोलत होते. यावेळी जि.प. सदस्य दशरथ काळभोर, माजी नगरसेवक भरत चौधरी, समीर घुले, बाळासाहेब थोरात, सुनिल बनसोडे, अंबादास शिंगे, सुरेश गायकवाड, दिलीप व्यव्हारे, सचिन कापरे, अदित्य हगवणे, सचिन कामठे, भरत शेंडकर, रवि उन्नेचा आदींसह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. 

वानवडी रामटेकडे क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत काम करणारे कंत्राटी सफाई कामगारांना गेल्या 4 महिण्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. पहाटे पासून काम करून घेतायत मात्र पगार दिला जात नाही. आमचा पगार द्या अन्यथा माजी आमदार महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.