Sat, Nov 17, 2018 23:41होमपेज › Pune › ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रेंना पुण्य भूषण पुरस्कार (video)

ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रेंना पुण्य भूषण पुरस्कार (video)

Published On: Mar 22 2018 2:49PM | Last Updated: Mar 22 2018 3:01PMपुणे : प्रतिनिधी

पुण्य भूषण फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा पुण्य भूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना जाहीर झाला आहे.  पुण्य भूषण फौंडेशनचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई यांनी गुरुवारी ही माहिती दिली. 

पुरस्काराचे यंदाचे ३० वे वर्ष असून स्मृतीचिन्ह आणि एक लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार येईल. यापुर्वी ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी, ज्येष्ठ नाटककार पु.ल.देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. जयंत नारळीकर, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि अभिनेते श्रीराम लागू यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Tag : Classical Singer, Praba Atre, Punyabhushan Award 2018, Pune