Tue, Jul 16, 2019 13:39होमपेज › Pune › चिंचवडला उद्या विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन

चिंचवडला उद्या विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 21 2018 12:36AMपिंपरी : प्रतिनिधी 

समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने सोमवारी (दि.22) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत चिंचवड येथील चैतन्य सभागृहात नववे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहीती कार्यवाह सुहास घुमरे यांनी दिली.  

प्रा. नरेंद्र नायडू यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून, या वेळी विद्यार्थ्यांचे संदेशनृत्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांची प्रकट मुलाखत, पथनाट्ये व ललित साहित्याचे अभिवाचन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. समारोप सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह विलास लांडगे व प्रा. अलका शिराळ यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होईल. कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे.