Thu, May 23, 2019 04:18होमपेज › Pune › मिरचीच्या कारखान्याला भीषण आग

मिरचीच्या कारखान्याला भीषण आग

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 12:42AMपुणे : प्रतिनिधी

उत्तमनगर परिसरातील शिवणे भागात दांगट पाटील परिसरात मिरचीच्या कारखान्याला भिषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

उत्तमनगर परिसरात शिवणेमध्ये मुख्य रस्त्यालगत दिनेश राठी यांची ग्राऊंड प्लस तीन मजली इमारत आहे. त्यांचा राठी फुड प्रॉडक्ट्स व्यावसाय असून, त्यांनी इमारतीमधील पहिल्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात मिरचीच्या साठवणूक केली होती. तर, दुसर्‍या मजल्यावर काही साहित्य ठेवले आहे.

दरम्यान सोमवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास अचानक याठिकाणी आग लागली. मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने येथील नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. सिंहगड रोड व कोथरुड अग्निशामक दलाचे प्रमुख पाथ्रुरडकर व ऊम्ररटकर यांनी दोन फायर बंब तसेच जवानांसोबत घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीने तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. याठिकाणी मोकळ्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अगीने आणखीनच रौद्ररूप धारण केले होते.

अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीवर नियत्रंण मिळविल्यानंतर पाण्याचा मारा करण्यात आला. समोरील तसेच शेजारच्या इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आले होते. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशामक दलाकडून वर्तविण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पुर्ण मिरची जळून खाक झाली आहे.