Tue, Jun 18, 2019 22:18होमपेज › Pune › अंगणवाड्यांतील बालके रस्त्यावर

अंगणवाड्यांतील बालके रस्त्यावर

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 12:35AMखडकवासला : दत्तात्रय नलावडे  

पुणे महापालिकेत  गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या अंगणवाड्यांना कोणी वाली नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. घरभाडे थकल्याने शिवणे; तसेच इतर गावांतील बालके अक्षरशः रस्त्यावर आली आहेत. पार्किंग, मंदिर अशा ठिकाणी अंगणवाड्या सुरू आहेत. महापालिका तसेच महिला व बालविकास विभागाने या चिमुरड्यांच्या अतोनात हलाखीकडे दुर्लक्ष केले आहे.

अंगणवाड्यांचे घरभाडे तातडीने देण्यात यावे अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी दिला आहे. केंद्र व राज्य  सरकार एकीकडे गोर गरीब बालकांच्या कल्याणासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहे तर दुसरीकडे कडे अंगणवाड्याचे घरभाडे कोणी देत नसल्याने गोर गरीब कष्टकरयांची ,अंगणवाड्यातील शेकडो बालके रस्त्यावर दाटी वाटीत , केविलवाणीपणे बसत आहेत. आठ महिन्यापासून शहरालगतच्या 24  अंगणवाड्याचे घरभाडे थकले आहे. 

हवेली तालुका महिला बाल विकास अधिकारी बी.एस. वाघमारे म्हणाले ,  पुणे महापालिकेत गावांचा समावेश करण्या पूर्वी संबंधित ग्रामपंचायत या अंगणवाड्याचे घरभाडे दरमहा देत असे. महापालिकेत गावे गेल्याने घरभाडे भरण्यासाठी  अनेकदा पालीकेला कळवले आहे. मात्र अद्याप त्याची दखल घेतली नाही.शिवणे येथे भाड्याच्या जागेत तीन अंगणवाड्या आहेत. देशमुखवाडी , दांगट वस्ती व आहीरेगेट येथील अंगणवाड्याचे घरभाडे कर्ज काढून संबंधित अंगणवाडी सेविकांनी भरले.घरभाडे भरण्यासाठी पैसे नसल्याने देशमुखवाडी येथील अंगणवाडी पार्किंगमध्ये सुरू आहे. अरूंद जागेत   दाटी वाटीत 27 बालके  केविलवाणीपणे बसत आहेत. जिन्याखाली बालकांचे अन्न शिजवले जात आहे. अंगणवाडी सेविका लता कुंडलीक कडू म्हणाल्या , घरभाडे देता येत नाही त्यामुळे पार्किंगमध्ये अंगणवाडी सुरू आहे. 

अशीच गंभीर स्थिती इतर अंगणवाड्याची आहे. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी ,उत्तमनगर ,शिवणे ,आंबेगाव आदी   11 गावातील अंगणवाड्याचे हस्तांतर शहरी बाल कल्याण विभागाकडे करण्याची कार्यवाही अद्याप सुरू सुरू झाली नाही  मात्र  भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या अंगणवाड्यां बंद करण्यात येणार नाही. असे महिला व 
बाल विकास विभागाचे म्हणणे आहे. एका  अंगणवाडीत सेविका व मदतनीस अशा दोन महिला कर्मचारी आहेत. त्यांना तीन महिन्यापासून पगार मिळाला नाही.दाट लोकवस्तीच्या या उपनगरी भागातील   अंगणवाडीत 30 ते 35 बालके आहेत.