Thu, Apr 18, 2019 16:39होमपेज › Pune › सायकलच्या हट्टामुळे मुलाची आत्महत्या 

सायकलच्या हट्टामुळे मुलाची आत्महत्या 

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 10:43PMपिंपरी : वडिलांनी सायकल घेऊन दिली नाही, म्हणून बारा वर्षाच्या मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (दि. 7) रात्री आठच्या सुमारास निगडी जवळ अप्पूघर येथे उघडकीस आला. 

इशांत बलबीर शर्मा (12, रा. सिद्धिविनायक नगरी, अप्पूघर, निगडी प्राधिकरण), असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. इशांत गेल्या काही दिवसांपासून वडिलांकडे सायकलची मागणी करीत होता. बलबीर यांनी त्याला सायकल घेऊन देण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र त्यासाठी इशांत हट्ट धरून बसला होता. इशांतचे वडील बलबीर कामात व्यस्त असल्याने त्यांना सायकल खरेदी शक्य झाले नाही. शनिवारी वडिलांनी सायकल न आणल्याचे पाहून इशांत रागावून त्याच्या खोलीत गेला. नेहमीप्रमाणे तो रागावला असेल आणि  थोड्या वेळात शांत होईल, असे समजून घरच्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. बराच वेळ झाला तरी इशांत बाहेर आला नाही. म्हणून घरच्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने वडिलांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी दरवाजा तोडला असता, इशांतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला