Thu, Nov 15, 2018 07:24होमपेज › Pune › पुण्यात आठ वर्षाच्या बालिकेवर वडिलांच्या मित्राकडून अत्‍याचार

पुण्यात आठ वर्षाच्या बालिकेवर वडिलांच्या मित्राकडून अत्‍याचार

Published On: May 17 2018 11:42AM | Last Updated: May 17 2018 11:41AMपिंपरी : प्रतिनिधी


घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत वडिलांच्या मित्राने आठ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे.

गोविंद भगवान अडसूळ (३० रा. मिलिंदनगर, पत्राशेड, पिंपरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.१४) दुपारी एकच्या सुमारास अडसूळ मित्राचा घरी गेला. त्यावेळी त्याची आठ वर्षीय मुलगी घरात एकटीच होती. घरात इतर कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पालक घरी आल्यावर पीडित मुलीने याबाबत सांगितले. 

या प्रकरणाचा तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.