Sun, May 26, 2019 08:35होमपेज › Pune › चिकुनगुनियाचे 928 रुग्ण सापडले

चिकुनगुनियाचे 928 रुग्ण सापडले

Published On: Dec 18 2017 2:41AM | Last Updated: Dec 18 2017 12:41AM

बुकमार्क करा

पुणे :

यावर्षी आतापर्यंत शहरात चिकुनगुनियाचे 928 रुग्ण सापडले आहेत. चिकुनगुनियाचे रुग्ण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये वाढले होते. तर या महिन्यात रुग्णांची संख्या निम्याने कमी झाली आहे.

या महिन्यात चिकुनगुनियाचे 61 रुग्ण सापडले आहेत. ऑक्टोबरमध्ये 262 तर नोव्हेंबरमध्ये 217 रुग्ण सापडले होते. चिकुनगुनिया हा एडिस डासांपासून पसणारा आजार असून पावसाळा संपल्यानंतर डासांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे एडिस डासांची संख्या नियंत्रणात आल्याने रुग्णांची संख्या घटली आहे.  ॉजानेवारीत 36, फेब्रुवारी 17, मार्च 17, एप्रिल 11, मे 4, जून 7, जुलै 28, ऑगस्ट 128, सप्टेंबर 140, ऑक्टोबर 262, नोव्हेंबर 217 तर 16 डिसेंबरपर्यंत 61 असे एकूण 928 रुग्ण सापडले आहेत. जानेवारी ते डिसेंबरदरम्यान दोन हजार 453 रुग्ण सापडले होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांपासून रुग्णांची वाढ झाली आणि एकट्या ऑक्टोबर महिन्यात 1234 रुग्ण शहरात सापडले होते. राज्याच्या तुलनेत पुणे शहरात या रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. तर, गेल्यावर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या केवळ 630 होती. यावर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या 1656 वर तर चिकुनगुनियाची संख्या 928 वर गेली आहे.