Tue, Nov 13, 2018 04:22होमपेज › Pune › मुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

मुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 1:03AMबारामती : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील पिंपळी येथे बुधवारी (दि. 25) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातून ही अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचल्यावर पुतळ्यावर अंत्यसंस्कार करताना पोलिसांनी तो ताब्यात घेतला.

पिंपळी ग्रामपंचायतीपासून पुतळ्याची ‘राम नाम सत्य है’चा घोष करत अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अंत्ययात्रेच्या पुढे तरुणाने शिकाळे धरले होते. स्मशानभूमीत ही अंत्ययात्रा पोहोचल्यावर शोकसभा घेण्यात आली.   स्मशानभूमीत पुतळ्याचे दहन करताना पोलिसांनी मज्जाव करत पुतळा ताब्यात घेतला. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

निरा-बारामती राज्य मार्गावर रास्ता रोको

सोमेश्वरनगर :  सकल मराठा समाजाने बुधवारी (दि. 25) करंजेपूल (ता. बारामती) येथे निरा-बारामती या राज्य मार्गावर आंदोलकांनी एकत्र येत रास्ता रोको केले. रास्ता रोकोसाठी परिसरातील हजारो युवक उपस्थित होते.