Thu, Aug 22, 2019 11:03होमपेज › Pune › सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्रीच जबाबदार

सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्रीच जबाबदार

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 1:59AMपुणे : प्रतिनिधी 

सत्तेवर आल्यानंतर एका महिन्यात मराठा आणि धनगर समाजास आरक्षण देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती; मात्र अद्याप काहीच झालेले नाही. त्यामुळे या मुद्द्यांवरून दोन्ही समाज नाराज झाले आहेत. त्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला मुख्यमंत्री स्वतःच जबाबदार आहेत, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे. खरे तर आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेसाठी जाणे गरजेचे होते. त्यांच्या मनामध्ये खरोखरच विठ्ठलाविषयी भाव, श्रद्धा असती, तर ते पंढरपूरला गेले असते. विठ्ठलाच्या पूजेसाठी भाजपचे मंत्रीही हजर राहिले नाहीत. भाजप नेते का घाबरत आहेत कळत नाही, असा टोलाही सिंह यांनी लगावला.

दिग्विजय सिंह यांनी दरवर्षीप्रमाणे सोमवारी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड, नगरसेवक अजित दरेकर, नगरसेविका वैशाली मराठे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.ते म्हणाले, केंद्रातील मंत्र्यांनाही बोलण्याची मुभा नाही. ना खाऊंगा ना खाने दुंगा, म्हणणारे मोदी राफेल विमान खरेदीबाबत माहिती देण्यास तयार नाहीत. त्यामुळे मोदींचा खरा चेहरा उघड झाला आहे.  

म्हणून अविश्‍वास प्रस्ताव आणला

भाजपप्रणीत मोदी सरकारला 4 वर्षे पूर्ण झाले आहेत. एनडीएतील घटक पक्ष, या सर्व पार्श्वभूमीवर आमच्याकडे संख्याबळ नाही, हे आम्हाला माहिती होते, तरीही आम्ही सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. अविश्वास ठराव हा संसदीय कार्यपद्धतीचा एक भाग आहे, असेही दिग्विजय सिंह म्हणाले.