Mon, Mar 18, 2019 19:16होमपेज › Pune › आरक्षणावरून निर्णाण झालेल्या परिस्थितीला मुख्यमंत्रीच जबाबदार  : दिग्विजय सिंह

'भाजप मंत्री एवढे का घाबरतात कळत नाही'

Published On: Jul 23 2018 3:43PM | Last Updated: Jul 23 2018 3:43PMपुणे : प्रतिनिधी 

सत्तेवर आल्यानंतर एका महिन्यात मराठा आणि धनगर समाजास आरक्षण देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र अद्याप काहीच नाही. त्यामुळे  आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीस मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी परंपरा न मोडता विठ्ठलाच्या पुजेसाठी पंढरपूरला यायला हवे होते. भाजपचे कोणीही मंत्री पुजेसाठी नव्हते, हे नेते का घाबरत आहेत, काही कळत नसल्याचा टोला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्वीजयसिंह यांनी लगावला. 

दरवर्षीप्रमाणे दिग्वीजयसिंह यांनी सोमवारी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील कॉंग्रेसभवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर आपली मते मांडली. ते म्हणाले, आरक्षणाच्या मुद्द्द्यावरून मराठा आणि धनगर समाजात मोठी नाराजी आहे. याला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहेत. भाजप प्रणीत मोदी सरकारला ४ वर्ष पूर्ण झाले आहेत. सरकारच्या कामगीरीवर जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. या सरकारने १५ लाख रुपये खात्यात जमा, काळा पैसा, नोटबंदी, भ्रष्टाचार, दहशतवाद या सर्व क्षेत्रात सरकार अपयशी ठरल्याचे म्हणत मोदी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री म्हणून मोदींनी ज्या ज्या गोष्टी नाकारल्या त्यांचा पंतप्रधान झाल्यावर पूर्ण स्वीकार केला.

अविश्वास ठरावावर भाषणे सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेल्या मिठीवरही त्यांनी भाष्य केले. काही कारण नसताना अफवा पसरवून लोकांना मारलं जात आहे. मात्र लहान लहान मुद्द्यांवर ट्विट करणारे पंतप्रधान यावर काहीच बोलत नाही. आमच्याकडे संख्याबळ कमी आहे, हे आम्हाला माहिती होते, मात्र नागरिकांमधील नाराजी, मोदींपासून दूर जाणेरे एनडीएतील घटक पक्ष, या सर्व पार्श्वभूमीवर अविश्वास ठराव आणला. अविश्वास ठराव हा संसदीय कार्यपर्धतीचा एक भाग आहे, असेही दिग्वीजयसिंह म्हणाले. 

यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड यांच्यासह कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.