Fri, Jul 19, 2019 19:52होमपेज › Pune › छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र घराघरांत वाचावे

छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र घराघरांत वाचावे

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:12AM

बुकमार्क करा
खडकवासला : वार्ताहर

भारतीयांच्या अंतःकरणात  राष्ट्रीय बाण्याचा वारसा जिवंत ठेवणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा तेजस्वी  जीवन चरित्र ग्रंथ घराघरांत वाचावा, असे आवाहन नगरसेविका राजश्री नवले यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 338 व्या राज्याभिषेक सोहळ्यात केले.

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या निगडे येथील शिवशंभू शिल्पसृष्टीत  आयोजित केलेल्या शंभूराजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात शेकडो  शिवभक्तांनी शंभूराजे यांना  मानवंदना दिली. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ स्मारकास जलाभिषेक व पुष्पहार पुणे महापालिकेच्या नगरसेविका राजश्री नवले व त्यांचे पती दिलीप नवले यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यावेळी हर हर महादेव, जय शंभूराजेच्या जयघोषाने सिंहगड खोरे दुमदुमून गेले. 

भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस सुनील जागडे, सुषमा जागडे, महेंद्र देवघरे, संदीप खाटपे, दीपक घोरपडे, ज्येष्ठ शिवभक्त अभिषेक लायगुडे, शिक्षण अधिकारी पांडुरंग थिटे, मालखेड विद्यालयाचे विलास जोरी, पंडित चेंडके, शुभम भोसले, निगडे शाळेचे मुख्याध्यापक देवराम गायकवाड, संतोष कांबळे, राजेन्द्र कुंभारकर आदी उपस्थित होते.  

नगरसेविका राजश्री नवले म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण छत्रपती संभाजी महाराज यांनी आयुष्यभर अंगीकारून रयतेच्या हिंदवी स्वराज्याच्या विस्तार केला. शंभूराजे अजिंक्यवीर होते. तसेच प्रखर बुद्धिमान होते. शंभूराजे यांनी  लिहिलेला बुधभूषण ग्रंथ म्हणजे राष्ट्राचा बहुमोल ठेवा आहे.  शंभूराजे   यांच्या प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जागर घराघरात व्हावा यासाठी त्यांच्या   चरित्र ग्रंथाचे  वाचन करावे.