Sun, Apr 21, 2019 00:34होमपेज › Pune › पिंपरीत साकारणार संभाजी महाराजांची सृष्टी 

पिंपरीत साकारणार संभाजी महाराजांची सृष्टी 

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 12:44AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी  चिंचवड महापालिकेच्या प्रभाग 21 पिंपरी  गाव येथील जोग महाराज उद्यानात छञपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य अशी सृष्टी साकारणार आहे. त्यामध्ये संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास, त्यावर आधारित शिल्प असणार आहेत. पुण्यातील भारत  इतिहास संशोधन केंद्रात यासंदर्भात शनिवारी बैठकही आयोजित करण्यात आली होती.

महापालिकेत  राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना तत्कालीन उपमहापौर नगरसेवक प्रभाकर वाघेरे व उषा वाघेरे यांनी पिंपरी गावात छञपती संभाजी महाराजांच्या सृष्टीसाठी प्रयत्न केले. या कामाचा शुभारंभही केला. या कामासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शनिवार (दि.5 ) रोजी भारत  इतिहास संशोधन केंद्रात यासंदर्भात बैठकही आयोजित करण्यात आली होती. इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्यासमवेत  नगरसेवक  संदीप वाघेरे तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे, शिल्पकार कुंभार यांनी या सृष्टीसंदर्भात चर्चा केली. दोनशे वर्षांपुर्वी गाव कसे होते, राहणीमान कसे होते तसेच, छञपती संभाजी महाराजांनी ताठ मानेने औरंगजेबाचा कसा सामना केला अशी अनेक प्रकारची महाराजांच्या पराक्रमाची शिल्पे या ठिकाणी साकारणार आहे. देशातील पर्यटक येथे संभाजी महाराजांची सृष्टी पाहण्याकरीता येतील ,अशा प्रकारचा हा प्रकल्प असेल असे वाघेरे यांनी सांगितले.