Tue, Mar 19, 2019 05:54होमपेज › Pune › ई-वाहनांसाठी महावितरणतर्फे चार्जिंग केंद्र

ई-वाहनांसाठी महावितरणतर्फे चार्जिंग केंद्र

Published On: Mar 09 2018 1:58AM | Last Updated: Mar 09 2018 1:02AMशिवाजी शिंदे 

पुणे : शहरात हळूहळू वाढत असलेल्या ‘ई-वाहनांसाठी’ प्रायोगिक तत्त्वावर लवकरच विविध ठिकाणी चाजिर्र्ंग केंद्र उभारण्यात येणार आहेत. पुण्यासह मुंबई,ठाणे,नागपूर आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पहिल्या टप्प्यात सुमारे पन्नास ठिकाणी केंद्र उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या निविदा मागविण्यात आली असल्याची माहिती महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड कार्यालयातील अधिकार्‍यांनी दिली.

राज्यातील बड्या शहरांमध्ये मोठ्य प्रमाणावर मागील अनेक वर्षापासून विविध इंधनावर चालणार्‍या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढत चालला आहे. वाहनात वापरण्यात येणार्‍या इंधनामुळे वाहनातून धूर येत आहे. या धुरामुळे प्रदुषणात प्रमाणापेक्षा जास्त वाढ होत आहे. त्यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन काही वर्षापासून विविध कंपन्यांनी बॅटरीवर चालणारी वाहने बाजारात आणली आहेत. सध्या नागरिकांना ही वाहने घरीच चाजिर्र्ंग करावी लागत आहेत. मात्र शहरात वाहने चालविताना बंद पडल्यास कोठेही वाहने चालविण्याची सुविधा उपलब्ध नाही. म्हणून महावितरणच्या वतीने शहरात विविध ठिकाणी ई- वाहनांसाठी चाजिर्र्ंग केंद्र उभारण्यात येणार आहेत. ही केंद्र शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील गर्दीच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे ज्या नागरिकांकडे ई- वाहने आहेत. त्यांना वाहनांचे चाजिर्र्ंग करणे सोयीचे होणार आहे. संबंधितांकडून चाजिर्र्ंगसाठी एका तासाला किती रूपये दर आकारावयाचा याबाबत अजूनतरी कोणताही निर्णय झालेला नाही.

पुण्यासह मुंबई, ठाणे,नागपूर आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पहिल्या टप्प्यात पन्नास ठिकाणी चाजिर्र्ंग केंद्र उभारण्यात येणार आहेत.त्यासाठी आवश्यक असलेली निविदा महावितरणच्या मुंबई येथे असलेल्या मुख्य कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आहेत.