Fri, Jul 19, 2019 18:33होमपेज › Pune › पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल

पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 10:41PMपुणे :  प्रतिनिधी 

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालख्यांचे शनिवारी पुण्यात आगमन झाले. रविवारच्या विसाव्यानंतर आज संत तुकाराम महाराज पालखी निवडुंगा विठोबा मंदिरातून तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरातून मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे शहरातील दोन्ही पालखींच्या मार्गावरील वाहतूक टप्प्या टप्प्याने बंद करण्यात येणार आहे. हे रस्ते पहाटे पाच ते पालखी पुणे शहराच्या हद्दीबाहेर जाईपर्यंत बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. 

संत कबीर चौक ते बेलबाग चौकामार्गे :  संत कबीर चौकातून रास्ता पेठ पॉवर हाऊस, जिजामाता चौक मार्गे बेलबाग चौकात जावे. 

संत कबीर चौक ते रामोशी गेट चौक :  पॉवर हाऊस फडके हौद देवजी बाबा चौक हमजेखान चौक मार्गे जावे.

सेव्हन लव्ह चौक ते रामोशी गेट चौक :  सेव्हन लव्ह चौकातून जेधे चौक मार्गे जावे.

गोळीबार मैदान ते सेव्हन लव्ह चौक : गोळीबार मैदान, सीडीए चौक, सॅलिसबरी  पार्क, लुल्ला नगर चौक, गंगाधाम चौकातून पुढे जावे.

मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान  : वानवडी बाजार चौक, लुल्लानगर चौक गंगाधाम चौकातून पुढे जावे.

ट्रायलक चौक एम. जी. रोड ते रामोशी गेट चौक :  एम. जी. रोड ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, बॅनर्जी चौक. 

मोरओढा चौक ते भैरोबानाला चौक :  सोलापूरकडे जाण्यासाठी घोरपडी गाव, रेल्वे गेट केशवनगर चौक मार्गे किंवा कोरेगाव पार्क जंक्शन, नॉर्थ मेन रोड, एसीबी फार्म चौक, केशवनगर मार्गे जावे.

भैरोबानाला ते मम्मादेवी चौक :  भैरोबानाला, वानवडी बाजार चौक लुल्लानगर चौक किंवा भैरोबानाला एम्प्रेस गार्डन रोड, मोरओढा मार्गे जावे

जांभूळकर चौक ते फातिमानगर चौक :  जांभूळकर चौक, जगताप चौक बी. टी. कवडे जंक्शन, काळुबाई जंक्शन रामटेकडी जंक्शन, वैदूवाडी जंक्शन, जुना कॅनॉल रोड जंक्शन, मगरपट्टा (मुंढवा जंक्शन), हडपसर बेस जंक्शनकडे जाण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर करता येईल. 

सिरम फाटा ते सोलापूर रोड 15 नंबर फाटा ते सोलापूर रोड :  पालखी व दिंड्या जात असताना तात्पुरता बंद ठेवला जाईल. प्रसंगानुसार सोलापूर रोडकडे वाहतूक सोडण्यात येईल. 

मंतरवाडी फाटा ते दिवेघाट :  पालखी दिवे घाटातून जाईपर्यंत मंतरवाडी फाटा, खडी मशीन, बोपदेव घाट व सासवड मार्गे जाता येईल. सोलापूर रोडने जड वाहतूक पुण्याकडे येण्यास बंदी असल्याने खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा. 

थेऊर फाटा ते पुणे :  थेऊर फाटा, केसनंद, वाघोली, अहमदनगर रोडने जावे.

मंतरवाडी फाटा ते हडपसर गाडीतळ :  सासवड , दिवेघाट, मंतरवाडी फाटा, उंड्री पिसोळी, खडी मशीन चौैक, लुल्ला नगर, मार्केट यार्ड, खडी मशीन ते कात्रज मार्गे जाता येईल. 

खराडी बायपास ते मगरपट्टा मार्गे सोलापूर रोड : सासवड, बोपदेव घाट, खडी मशीन चौक किंवा खराडी बायपास, अहमदनगर रोड, केसनंद थेऊरफाटा मार्गे जावे.

जड वाहनांकरिता मालधक्का चौक ते पावर हाउस चौक बंद : मालधक्का-शाहिर अमर शेखचौक, कुंभार वेस चौक, गाडीतळ पुतळा, शिवाजी रोडने पुढे जावे.

दिंडीसोबत येणार्‍या वाहनांनी भैरोबानाला चौक, लुल्लानगर चौक, कोंढवा खडी मशीन चौक, बोपदेव घाटमार्गे सासवड किंवा मंतरवाडी फाटा, फुरसुंगी मार्गे उंड्री पिसोळी, खडी मशीन चौक मार्गे बोपदेव घाटाकडून सासवड या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

सोमवारी शहरात जड वाहने आल्याने वाहतूक समस्या निर्माण होऊ नये यासाठी सोलापूर, सासवड व अहमदनगरकडून मुंबईकडे जाणारी व येणार्‍या जड वाहनांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा. 

सोलापूरकडून नगर, नाशिक, मुंबईकडे येणार्‍या व जाणार्‍या वाहनांकरिता 

चौफुला-केडगाव-पारगाव-नाव्हरे फाटा-नगर रोड-शिक्रापूर-चाकण- तळेगाव

थेऊर फाटा- केसनंद -वाघोली-लोणीकंद-नगररोड-मरकळ-मोशी

सासवडकडून मुंबई, नाशिक, नगरकडे येणारी व जाणारी वाहने 

सासवड-नारायणपूर-कापूरहोळ-कात्रज बायपास 

सासवड- बोपदेव घाट- कात्रज बायपास 

मुंबईहून अहमदनगरकडे जाणार्‍या वाहनांनी तळेगाव येथून चाकण शिक्रापूरमार्गे जावे